नमो नमो भारता विश्व वंद भारता ! वाघिणीचे दूध तू प्रशिले सिंहाचे दातही तू मोजिले भूवरी नृपतींना तू नमविले अखंड भारत य राज्य दिले तव गुण गाया शब्द अपुरे तूच अमुचा विधाता नमो नमो भारता विश्व वंद भारता ! तव ललाटी चन्द्र कोर वरी बिंद सूर्य समान गज बाहू बलशाली तुझे रूप तुझे शिव समान तव मस्तकी नाग मुकुट शोभतो विश्व वंद सम्राटा नमो नमो भारता विश्व वंद भारता ! मूळ भारतीय तुझी लेकरे ,आशिष तू आम्हा वरी धरे नाही उणे या भूवर तू माता पिता पालन करे समता , बंधुत्व इथे नांदू तूच गण नायक विघ्णहर्ता नमो नमो भारता विश्व वंद भरता ! #जनसेनानी , #Jansenani कल्याण ३ जुलै , २०१८
Posts
Showing posts from July, 2018